८०० रुपयांच्या वादातून रुद्राक्ष विक्रेत्याचा खून; मृताचे दात दगडाने तोडून बॅगेत ठेवले

८०० रुपयांच्या वादातून रुद्राक्ष विक्रेत्याचा खून; मृताचे दात दगडाने तोडून बॅगेत ठेवले

भडगाव : अवघ्या ८०० रुपयांच्या पैशांच्या वादातून पारधी समाजातील एका तरुणाने आपल्या नात्यातील व्यक्तीचा दगडाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना भडगाव परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृताचे नाव धर्मा जुगा पवार (वय ४०) असून आरोपीचे नाव जुगा कांतिलाल पवार (वय ३०) आहे. दोघेही गावोगावी फिरून रुद्राक्ष विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी धर्मा पवार यांनी सुमारे ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. त्यानंतर दोघेही स्टेशनजवळ सायंकाळी साडेसात ते आठच्या सुमारास मद्यपान करण्यासाठी गेले. यावेळी पैशांच्या व्यवहारावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि आरोपीने दगडाने हल्ला करून धर्मा पवार यांचा खून केल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळाजवळील शेतात बसून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरात काही कुत्रे सतत भुंकत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने जाऊन पाहणी केली. त्यावेळी आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात येते.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या बॅगेत मृताचे तोडलेले दात तसेच दोन जिवंत कबुतरे आढळून आली. कबुतरे खाण्यासाठी आणल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण, घटनाक्रम आणि आरोपीच्या कृत्यामागील परिस्थितीचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *