स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात अभिवादनाचे भव्य फलक; स्वातंत्र्य चौक, बसस्थानक व आकाशवाणी चौकात आकर्षक उभारणी
जळगाव | प्रतिनिधी:
स्वर्गीय लोकनेते तथा विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात विविध ठिकाणी अभिवादनपर भव्य फलक उभारण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वतीने हे फलक लावण्यात आले असून, शहरातील प्रमुख चौकांमध्ये त्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे.

शहरातील स्वातंत्र्य चौक, मध्यवर्ती बसस्थानक परिसर, आकाशवाणी चौक तसेच इतर प्रमुख मार्गांवर उभारण्यात आलेल्या या फलकांवर “सेवाव्रती, विकासप्रेमी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” असा संदेश देण्यात आला आहे. तसेच आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली आहे.

जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या या आकर्षक फलकांमुळे शहरात वेगळे वातावरण निर्माण झाले असून, अनेक नागरिकांनी या फलकांची दखल घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण जागवित त्यांच्या समाजाभिमुख आणि विकासकेंद्री विचारांना अभिवादन केले.
जळगाव शहरातील प्रमुख चौकांमध्ये उभारण्यात आलेले हे फलक सध्या चर्चेचा विषय ठरत असून, जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

– धाडस महाराष्ट्र न्यूज