लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त जळगावात अभिवादन; रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसा
जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव शहरात अभिवादन व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती, राष्ट्रीय साठे सेना आणि माँ महाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, माजी खासदार ईश्वरदादा (बाबूजी) जैन, माजी आमदार मनीषदादा जैन, शरदभाऊ तायडे, नगरसेवक संतोष पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, पियुष पाटील, जितूभाऊ बागरे, अरुण चांगरे, अतुल बारी, अमोल कोल्हे, प्रवीणभाऊ कोल्हे, दीपकभाऊ सुरवंशी, अनिलभाऊ अडकमोल, आनंदभाऊ सोनवणे, महेशभाऊ चौधरी, सौ. मंगला बारी, बनसोडे ताई आदी मान्यवर उपस्थित होते.
पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दुपारी १ वाजेपर्यंत ८ जणांनी रक्तदान केले होते. सायंकाळी ३ वाजेपर्यंत ३५ ते ४० रक्तदाते सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवेचा संदेश देत अनेक युवकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन राष्ट्रीय साठे सेनेचे धीमंत रमेश साठे यांनी केले. माँ महाशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. आशाताई अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश गायकवाड, मुकेश अंभोरे, आनंद पाचुंदे, मनोज सपकाळे, यश अंभोरे, गोविंदा अंभोरे, राजू गायकवाड, विकास मरसाळे, मोहन मरसाळे, उज्वला सपकाळे, प्रियंका सपकाळे, रेखा गरुड, साधना चित्ते, संजना गोसावी, प्रतिभा जगताप, पौर्णिमा कोळी, गोपाल गायकवाड, जय गायकवाड, विनायक गायकवाड, हेमंत गायकवाड, संकेत गायकवाड, विजय मरसाळे तसेच इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.
रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून पुण्यतिथी साजरी करत आयोजकांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
