“सुगरण पक्ष्याच्या नजरेतून आयुष्याचा अर्थ सांगणारे श्रीकांत धिवरे!”

  1. जागतिक फोटोग्राफी दिनाच्या शुभेच्छा!!

सुगरण पक्षी

— श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव

प्रजनन काळात (पावसाळ्यात) नर बया पक्ष्याच्या शरीरावर आकर्षक, वैशिष्ट्यपूर्ण पिवळा रंग यायला लागतो.

तो म्हणतो

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन

भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये लगन

घरटे फक्त नर बया पक्षीच बांधतो. एक घरटे पूर्ण करण्यासाठी नर बया सुमारे ५०० फेऱ्या मारतो आणि घरटे बांधण्यासाठी साधारण १८ दिवस लागतात.

(इन भूलभुलैया गलियो में

अपना भी कोई घर होगा

अम्बर पे खुलेगी खिड़की या

खिड़की पे खुला अम्बर होगा.

दो दीवाना शहर में.. (पण इथे एकच दीवाना असतो).)

घरटे अर्धवट तयार झाल्यावर नर बया मादीला आकर्षित करण्यासाठी प्रदर्शन करतो. (फोटो प्रमाणे) तो पंख फडफडवत आणि आवाज करत घरट्याला लटकतो.

(ये दिल्लगी ये शोखिया सलाम की

यही तो बात हो रही है काम की

कोई तो मुड़ के देख लेगा इस तरफ

कोई नज़र तो होगी मेरे नाम की

पुकारता चला हूँ मैं..)

मादी बया घरट्याची पाहणी करते आणि घरटे व नर तिला पसंत असल्यास त्याची स्वीकृती दर्शवते.

(वो आए हमारे घर में खुदा कि कुदरत है,

कभी हम उनको कभी अपने घर को देखते है.)

नर आणि मादीची जोडी जमल्यानंतर नर घरटे पूर्ण करतो आणि त्यामध्ये प्रवेशासाठी बोगद्यासारखा मार्ग तयार करतो.

तो म्हणतो.

(तुम जो मिल गए हो, तो ये लगता है

के जहां मिल गया

एक भटके हुए राही को, कारवाँ मिल गया…)

आणि ती म्हणते.

(अब तो है तुमसे हर खुशी अपनी

तुमपे मरना है ज़िंदगी अपनी.)

विशेष म्हणजे, अभ्यासानुसार बया पक्ष्याची मादी घरटे निवडताना मुख्यतः घरट्याचे स्थान आणि सुरक्षितता हे निकष पाहते. त्यांना उंच झाडांवरील आणि कोरड्या जमिनीवर असलेली घरटी अधिक पसंत असतात.

तीला वाटत असतं-

(ऊँचे-ऊँचे परबत जब चूमते हैं अम्बर को

प्यासा-प्यासा अम्बर जब चूमता है सागर को

प्यार से कसने को, बाहों में बसने को

दिल मेरा ललचाये, कोई तो आ जाए

ऐसा कोई साथी हो…)

मादीने नाकारलेली घरटी तसेच त्यांचा नर बया सोडून देतो. नंतर इतर पक्षी या सोडलेल्या घरट्यांतील साहित्य आपल्या घरट्यांसाठी वापरतात.

(तुम न जाने किस जहाँ में खो गये

हम भरी दुनिया में तनहा हो गये.)

त्यानंतर नर बया पुन्हा नवीन घरटे बांधण्यास सुरुवात करतो—मात्र यावेळी आधीच्या अनुभवामुळे तो अधिक अनुभवी झालेला असतो.

(रुक जाना नहीं तू कहीं हार के

कांटों पे चल के मिलेंगे साये बहार के

ओ राही, ओ राही…….)

आणि कोण बरोबर, कोण चूक असे निरर्थक निष्कर्ष न काढता निसर्ग त्याच्या स्थितप्रज्ञ गतीने पुढे सरकत रहातो…

— श्रीकांत धिवरे

पोलीस अधीक्षक, जळगाव.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *