शिक्षणातील उत्कृष्ट कार्याचा गौरव! ‘विनोबा’ पुरस्कारांनी जळगाव जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांचा झाला सन्मान

जळगाव | प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण अध्यापन, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने Open Links Foundation च्या ‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठांतर्गत आयोजित Post of the Month (POM), Contest, Morning Assembly आणि Top Cluster – मे २०२६ या जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषद, जळगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील १२ गुणवंत शिक्षक तसेच उत्कृष्ट क्लस्टर्सचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षक हे समाजपरिवर्तनाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देण्यासाठी शिक्षकांनी केलेले योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले. नावीन्यपूर्ण उपक्रम, डिजिटल शिक्षण, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक पद्धती यामुळे ग्रामीण भागातील शिक्षणात सकारात्मक बदल घडत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Post of the Month (POM) या विभागात श्री. राहुल पाटील (बिडगाव, ता. चोपडा), श्रीमती योगिता लोखंडे (पिंप्री बुद्रुक, ता. धरणगाव), श्रीमती नीता काकर (घोडसगाव, ता. मुक्ताईनगर) आणि श्रीमती उमा वानखेडे (जळू, ता. एरंडोल) यांचा उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

Contest विभागात श्रीमती शीतल सोनार (सोनवड बुद्रुक, धरणगाव), श्रीमती मनीषा पवार (खर्ची खुर्द, एरंडोल), श्रीमती अनिता शिंगारे (तोरणाळे, जामनेर) आणि श्री. विनोद धनगर (सारोळे बुद्रुक, पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Morning Assembly विभागात विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविणाऱ्या प्रभावी उपक्रमासाठी श्रीमती पल्लवी शिंदे (हातेड, चोपडा) यांचा गौरव करण्यात आला.

याचबरोबर Top Three Cluster म्हणून सोनवड क्लस्टर (KP श्री. सुनील पाटील), तोरणाळे क्लस्टर (KP श्री. दीपक सर) आणि रिंगणगाव क्लस्टर (KP श्रीमती मनीषा सोनवणे) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. निलेश रत्ना देविदास पाटील, उपशिक्षणाधिकारी श्रीमती स्वाती हवेले, श्री. नरेंद्र चौधरी तसेच श्री. विजय सरोदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत शिक्षणात गुणवत्ता, नवोपक्रम आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘विनोबा’ हा पुरस्कार केवळ सन्मान नसून शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याला समाजाने दिलेली आदराची पावती आहे. अशा उपक्रमांमुळे शिक्षकांना नवचैतन्य मिळते, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळते आणि विद्यार्थ्यांपर्यंत अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचण्यास मदत होते.

या पुरस्कार सोहळ्याचे नियोजन आणि समन्वय हितेश भालेराव व सचिन ससाणे (जिल्हा समन्वयक), टीम जळगाव – महाराष्ट्र, Open Links Foundation यांनी यशस्वीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक करत, भविष्यातही अशा प्रेरणादायी उपक्रमांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त केली.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *