जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात अवैध दारू विक्रीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, दारूच्या नशेत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून गावातील नागरिकांनी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी अमोल बाबुराव महाजन (वय 39) याच्याविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिवरखेडा परिसरात अनेक दिवसांपासून खुलेआम अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
संशयित आरोपी अमोल महाजन याने गावातीलच एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अमोल हा तेथून प्रसार झाला. मात्र दोन दिवसानंतर आज हा प्रकार उघडकीस आला आणि जामनेर पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी अमोल महाजन याला ताब्यात घेतले आहे. सदरील घटनेचा तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.
“गावात अवैध दारू विक्रीवर वेळीच कारवाई झाली असती, तर अशी दुर्दैवी घटना घडली