जि.प. शाळांचा दबदबा! इंग्रजी स्पेलिंग बी स्पर्धेत चिमुरड्यांचा भीमपराक्रम.
जिल्हास्तरीय स्पर्धेत १६ विद्यार्थ्यांचा गौरव; जिल्हा परिषद जळगाव व ओपन लिंक्स फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
जळगाव, दि. २३ सप्टेंबर २०२६ : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा कौशल्याला वाव देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद, जळगाव आणि ओपन लिंक्स फाउंडेशन (विनोबा टीम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धेचा अंतिम सामना उत्साहात पार पडला. भुसावळ रोडवरील कालिका माता मंदिराजवळील हॉटेल कमल पॅराडाईज येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून निवड झालेले विद्यार्थी सहभागी झाले.
दि. ११ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेतून निवड झालेले चार गटांतील विद्यार्थी जिल्हास्तरीय अंतिम फेरीत सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणधीर सोमवंशी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. निलेश पाटील, जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी तसेच ओपन लिंक्स फाउंडेशनच्या विनोबा टीमचे विभागीय प्रबंधक श्री. श्रीकांत सावंत व सहकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणाधिकारी श्री. निलेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द देऊन त्यांचे अचूक Spelling विचारण्यात आले. बाद फेरी पद्धतीने प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व प्रोत्साहनपर विजेते निवडण्यात आले.
विजेत्या विद्यार्थ्यांची यादी
गट १ – इयत्ता १ ली ते २ री
प्रथम – संस्कार संजय तिकांडे – जि.प. शाळा, शिंदी, ता. चाळीसगाव
द्वितीय – तन्मय समाधान धनगर – जि.प. प्राथमिक शाळा, भराडी, ता. जामनेर
तृतीय – अंकित विलास सुरवाडे – जि.प. प्राथमिक शाळा, किनगाव बु., ता. यावल
प्रोत्साहनपर – विराट विकास गायकरवाड – जि.प. प्राथमिक शाळा, एकुलती, ता. जामनेर
गट २ – इयत्ता ३ री ते ४ थी
प्रथम – मृणाक्षी हर्षल भोसले – जि.प. शाळा, लोंढे, ता. चाळीसगाव
द्वितीय – फैज इमरान खान कुरेशी – जि.प. प्राथमिक शाळा, ता. भडगाव
तृतीय – अंकिता रविंद्र पाटील – जि.प. शाळा, कुऱ्हे खु., ता. अमळनेर
प्रोत्साहनपर – असद अली सलमान अली – जि.प. उर्दू शाळा क्र. २, ता. मुक्ताईनगर
गट ३ – इयत्ता ५ वी ते ६ वी
प्रथम – प्रिन्स गोकुळ चव्हाण – जि.प. प्राथमिक शाळा, बेलदारवाडी, ता. चाळीसगाव
द्वितीय – नशरा साई वसीम बागवान – जि.प. उर्दू कन्या शाळा, ता. बोदवड
तृतीय – अश्मीरा जहीर खान – जि.प. उर्दू कन्या शाळा क्र. १, ता. भडगाव
गट ४ – इयत्ता ७ वी ते ८ वी
प्रथम – आयशा इमरान खाटीक – जि.प. उर्दू शाळा, किनगाव, ता. यावल
द्वितीय – राजश्री प्रकाश नवरे – जि.प. प्राथमिक शाळा, बांभोरी प्र. चा., ता. धरणगाव
तृतीय – शेख उमर शेख आरिफ – जि.प. उर्दू शाळा क्र. २, ता. मुक्ताईनगर
प्रोत्साहनपर – भाग्यश्री प्रकाश धनगर – जि.प. प्राथमिक शाळा, खंडाळे, ता. भुसावळ
सर्व १६ विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
इंग्रजीबाबत आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न
‘स्पेलिंग बी’ ही स्पर्धा केवळ शब्दांचे स्पेलिंग सांगण्यापुरती मर्यादित नसून जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबाबत आत्मविश्वास, अचूकता आणि शिकण्याची उत्सुकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत आत्मविश्वासाने व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. शिक्षक व पालकांनीही उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले. भविष्यातही हा उपक्रम सातत्याने राबविला जाईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
