जळगाव पोलिसांचा जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम; जळगांवकरांसाठी भव्य ‘रील्स स्पर्धे’चे आयोजन

जळगाव पोलिसांचा जनजागृतीसाठी अभिनव उपक्रम; जळगांवकरांसाठी भव्य ‘रील्स स्पर्धे’चे आयोज

जळगाव : समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जळगाव पोलिसांनी नागरिकांसाठी भव्य रील्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १८ वर्षांवरील कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो. सामाजिक विषयांवर प्रभावी संदेश देणाऱ्या रील्सच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

स्पर्धेसाठी चार महत्त्वाचे विषय निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये तरुण पिढीवर ड्रग्सचे दुष्परिणाम व त्यावरील उपाय, प्राणांतिक अपघात टाळण्यासाठी खबरदारी व उपाय, समाजातील महिला सबलीकरण, तसेच सायबर गुन्हे प्रतिबंध व उपाय या विषयांचा समावेश आहे.

स्पर्धेसाठी तयार करण्यात येणाऱ्या रील्सची कालावधी १ मिनिट ३० सेकंदांपेक्षा कमी असावी. सहभागी स्पर्धकांनी आपल्या रील्स व्हॉट्सअॅप क्रमांक +91 97022 00315 वर २८ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवायच्या आहेत.

प्रत्येक विषयामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके तसेच जळगाव पोलिसांचे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे. विजेत्यांचा गौरव स्वतंत्र कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

जळगाव पोलिसांनी नागरिकांना या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामाजिक जनजागृतीसाठी आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *