शिव कॉलनी ते रेल्वे लाईन समांतर रस्त्याची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी.

शिव कॉलनी ते रेल्वे लाईन समांतर रस्त्याची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून पाहणी

जळगाव : जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील शिव कॉलनी ते रेल्वे लाईन दरम्यानचा प्रलंबित समांतर रस्ता अखेर पूर्ण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पूर्ण करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी महापौर तथा प्रभाग ७ च्या नगरसेविका दीपमाला काळे यांनी गुरुवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली.

या पाहणीवेळी स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य माधुरी अत्तरदे, नगरसेविका अंकिता पंकज पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. देवरे उपस्थित होते.

शिव कॉलनी परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या समांतर रस्त्याची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात होती. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यावेळी महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, “नागरिकांची गैरसोय दूर करणे आणि शहराचा विकास हेच आमचे मुख्य ध्येय आहे. या समांतर रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुटसुटीत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”

समांतर रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी महापौर दीपमाला काळे तसेच उपस्थित नगरसेवकांचे आभार मानले. रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त करत आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी पंकज पाटील, चेतन तिवारी, ऋषिकेश शिंपी, कमलाकर झांबरे, बाळासाहेब चौधरी, सुमेरसिंग राजपूत, सुनील महाजन, पराग चौधरी, ऋषी राजपूत, सुधाकर सोनवणे, मनोज जावळे, चेतना चौधरी, ज्योती महाजन, शारदा चौधरी, काजल महाजन, ललिता जावळे आदी नागरिक उपस्थित होते.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *