अस्तित्व लढा’च्या वतीने जळगावात प्रेरणा व सक्षमीकरण मेळावा

अस्तित्व लढा’च्या वतीने जळगावात प्रेरणा व सक्षमीकरण मेळावा

जळगाव : जीवनात अनेकदा दुःख सहन करून नव्याने उभे राहणाऱ्या महिलांना आत्मविश्वास, स्वाभिमान आणि स्वावलंबनाची नवी दिशा मिळावी, या उद्देशाने ‘अस्तित्व लढा’ व मोनाली कामळस्कर फाउंडेशन संचलित ‘काथार सुखी मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रेरणा व सक्षमीकरण मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.

‘नव्या आयुष्याची नवी उमेद – स्वाभिमान, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाकडे पाऊल’ या संकल्पनेवर आधारित या मेळाव्यात महिलांसाठी विविध मार्गदर्शनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मेळाव्यात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वागत, प्रस्तावना आणि मान्यवरांचे मनोगत, तसेच सहभागी महिलांचे प्रेरणादायी अनुभव मांडले जाणार आहेत. यासोबतच महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती, स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या संधी, मानसिक आरोग्य सत्र, समुपदेशन व ध्यान-मनोरंजन आणि मुक्त संवाद व प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला अॅड. मंजुळा मुंडडा, अॅड. भारती कुमावत आणि सौ. दीप्ती बारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अनुभवी समुपदेशकांकडून महिलांना मार्गदर्शन मिळणार असून, सरकारी योजनांची सविस्तर माहितीही देण्यात येणार आहे.

मेळावा २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता जळगाव येथील शेठ नागो गणू वाणी मंगल कार्यालय, गुजराथी गल्ली, न्यू बी.जे. मार्केट जवळ येथे आयोजित करण्यात आला आहे.

महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या प्रेरणादायी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘अस्तित्व लढा’ ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्क : ९६०२१३६२१

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *