डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती

डिजिटल मीडिया विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रविण पाटील यांची नियुक्त

जळगाव | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या डिजिटल मीडिया विभागाच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्षपदी ‘Live Trend’चे पत्रकार प्रविण श्रावण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तथा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून, संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

प्रविण पाटील हे गेल्या काही काळापासून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. जळगाव जिल्ह्यातील डिजिटल माध्यमातील पत्रकारांना संघटित करणे, त्यांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणे तसेच संघटनेचा जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी ते कार्य करतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या नियुक्तीबद्दल पत्रकारिता, सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रविण श्रावण पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

यावेळी सचिन गोसावी, नगराज पाटील, भूषण महाजन, भगवान मराठे, संतोष नवले, योगेश सैतवाल, गोपाल सोनवणे, संजय चौधरी, अबरार मिर्झा, चंदू खरे आदींनी प्रविण पाटील यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *