आदर्श सरपंच मोहन सपकाळे यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ पुरस्काराने गौरव

आदर्श सरपंच मोहन सपकाळे यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ पुरस्काराने गौर

यावल | प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आदर्श सरपंच मोहन एकनाथ सपकाळे यांची सामाजिक, विकासाभिमुख आणि लोकहिताची उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन त्यांची ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा सन्मान नालंदा ऑर्गनायझेशन, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणार असून, त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

नालंदा ऑर्गनायझेशनने राज्यभर केलेल्या सर्वेक्षणात विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली. त्यामध्ये आदर्श सरपंच म्हणून मोहन सपकाळे यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. ग्रामविकास, पारदर्शक प्रशासन, जनसहभागातून विकासकामे, स्वच्छता, सामाजिक उपक्रम आणि नागरिकाभिमुख कामकाजामुळे त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेने दिलेल्या अधिकृत पत्रानुसार, ‘सह्याद्रीरत्न गुणगौरव सन्मान सोहळा २०२६’ अंतर्गत मोहन सपकाळे यांचा गौरव करण्यात येणार आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

हा पुरस्कार वितरण सोहळा १ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

मोहन सपकाळे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानामुळे यावल तालुका आणि जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामविकासाच्या माध्यमातून केलेल्या त्यांच्या कार्याची ही योग्य दखल असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *