महापौर दीपमाला काळेंसह ७५ सायकलवीरांची जळगाव ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात रवाना होणार

महापौर दीपमाला काळेंसह ७५ सायकलवीरांची जळगाव ते पंढरपूर सायकल वारी उत्साहात रवाना होणार.

जळगाव | प्रतिनिधी :

आषाढी एकादशीच्या निमित्ताने जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जळगाव ते पंढरपूर सायकल वारीला गुरुवार, दि. ९ जुलै रोजी पहाटे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ होणार आहे. सागर पार्क येथून सकाळी ५ वाजता या वारीला हिरवा झेंडा दाखवून सायकलवीरांना निरोप देण्यात येणार आहे.

यंदाच्या वारीत जळगावच्या महापौर श्रीमती दीपमाला काळे यांच्यासह तब्बल ७५ सायकलवीर सहभागी होत आहेत. महापौर दीपमाला काळे या सलग दुसऱ्या वर्षी या सायकल वारीत सहभागी होत असून, त्या सुमारे ४८५ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करणार आहेत.

विठ्ठल नामाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही वारी मार्गस्थ होणार आहे. पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी जीवनशैली आणि वारकरी परंपरेचा संदेश देणारा हा उपक्रम असल्याने नागरिकांकडून त्याचे स्वागत होत असून, सहभागी सायकलवीरांना शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

ही सायकल वारी शनिवार, दि. ११ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पंढरपूर येथे पोहोचणार असून, विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन वारीची सांगता होणार आहे. जळगाव सायकलिस्ट ग्रुपतर्फे दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

NID:SIZE:825 KB

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *