आर. आर. तडवींच्या पाठपुराव्याला यशाची किनार; अमोल पवार कार्यमुक्त.
मुंबई | प्रतिनिधी
महिला व बाल विकास विभागातील परिविक्षा अधिकारी अमोल रूस्तुमराव पवार यांना मंत्रालयातील कार्यासन-७ वरील पदभारातून कार्यमुक्त करण्यात आले असून त्यांच्या सेवा पुन्हा शासकीय महिला भिक्षेकरीगृह, चेंबूर येथे हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा कार्यालयीन आदेश उपसचिव आ. ना. भोडवे यांनी ६ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अमोल पवार यांच्यावर विविध आरोप करत आर. आर. तडवी यांनी पत्रकार परिषद घेतली होती. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली आणि विविध माध्यमांनीही त्याकडे लक्ष वेधले.
या पार्श्वभूमीवर आता अमोल पवार यांना मंत्रालयातील जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आल्याने तडवी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा परिणाम झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या धाडस महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तांकनाचीही चर्चा होत असून, अनेकांनी याला माध्यमांच्या पाठपुराव्याचे यश मानले आहे.
दरम्यान, या प्रकरणी आर. आर. तडवी यांनी सातत्याने आवाज उठवत पत्रकार परिषदेद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर धाडस महाराष्ट्र न्यूजनेही या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून संबंधित मुद्दे जनतेसमोर मांडले होते.
आता अमोल पवार यांना मंत्रालयातील पदभारातून कार्यमुक्त करण्यात आल्याने या कारवाईची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या निर्णयामुळे आर. आर. तडवी यांच्या आंदोलनाला आणि पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात पुढे आणखी कोणती प्रशासकीय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
