नात्याला काळीमा : सख्ख्या मावसानेच केला मुलीवर अत्याचार !


नात्याला काळीमा : सख्ख्या मावसानेच केला मुलीवर अत्याचार

रावेर तालुक्यातील एका गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली असून यात एका नराधम मावसाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NID:SIZE:825 KB

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावात एक भयंकर घटना घडली आहे. यात सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नात्याने तिचा काका (मावसा) लागणाऱ्या ४७ वर्षांच्या प्रौढाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार १२/११/२०२५ ते २९/५/२०२६ या कालावधीत घडला. या मुलीवर त्या व्यक्तीने दबाव टाकून बळजबरीने शारीरीक संबंध बनविले. अखेर या मुलीने आज या संदर्भात सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली.

यानुसार, आज सावदा पोलीस स्थानकात त्या नराधमाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४ (२) (एफ); ३५१(२) आणि पोक्सो कायद्यातील कलम ४,६,५, (एन) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राहूल सानप, हवालदार मेहरबान तडवी आणि कॉन्स्टेबल संजय तडवी हे करत आहेत. या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून या नराधमाच्या विरूध्द तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *