जळगाव महापालिकेत वजनकाटा बसवण्यात मोठा भ्रष्टाचार; उपमहापौर मनोज चौधरींचा खळबळजनक आरोप जळगाव:
जळगाव महापालिकेत वजनकाटा बसवण्यात मोठा भ्रष्टाचार; उपमहापौर मनोज चौधरीं
जळगाव महानगरपालिकेत वजनकाटा बसवण्यावरून आणि त्याच्या देखभालीवरून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप उपमहापौर मनोज चौधरी यांनी केला आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून कमी क्षमतेचे वजनकाटे जास्त किमतीत खरेदी करण्यात आले असून, यात लाखो रुपयांचा अपहार झाल्याची शंका त्यांनी उपस्थित केली आहे. तसेच खासगी वजनकाटा चालकांना फायदा पोहोचवण्यासाठी मनपाचे स्वतःचे काटे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
३० टनाचा काटा, किंमत मात्र ५० टनाची!
उपमहापौर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने नगरपालिका व महानगरपालिकांना ५० टन क्षमतेचा वजनकाटा बसवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. बाजारात ५० टन क्षमतेचा वजनकाटा साधारण ५ लाख ७१ हजार रुपयात मिळतो. असे असताना मनपाच्या आरोग्य विभागाने शासनाचे नियम डावलून ९ लाख ५० हजार रुपये खर्च करत अवघ्या ३० टन क्षमतेचे दोन वजनकाटे खरेदी केले. दोन ठिकाणी मिळून यात सुमारे ७ लाख ५८ हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा संशय चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
सरकारी काटे गायब; खासगी चालकांवर लाखांची खैरात
मनपाने एक वजनकाटा टी.बी. हॉस्पिटल परिसरात तर दुसरा कचरा डेपोवर (डम्पिंग ग्राउंड) बसवला होता. मात्र, काही काळातच टी.बी. हॉस्पिटल येथील वजनकाटा बंद पडला. त्या ठिकाणी ई-बसचे चार्जिंग स्टेशन होणार असल्याने तो काटा काढण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. परंतु, “तो काढलेला वजनकाटा सध्या कुठे आहे?” याचे उत्तर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडे नाही.
हा काटा गेली दोन वर्षे बंद असल्याने महापालिकेच्या कचऱ्याचे वजन एका खासगी वजनकाट्यावर केले जात आहे. यासाठी मनपाने गेल्या ६ ते ७ महिन्यांत संबंधित खासगी काटा मालकाला १३ लाख ३७ हजार रुपये अदा केले असून, आणखी २ ते ३ महिन्यांचे बिल देणे बाकी आहे.
”इतका प्रचंड पैसा खासगी व्यक्तीला देण्यापेक्षा महापालिकेने स्वतःचे नवीन वजनकाटे बसवले असते, तर वर्षभराच्या बिलाच्या रकमेत ५०-५० टन क्षमतेचे दोन नवीन काटे आले असते. मग मनपाने स्वतःचे वजनकाटे का बसवले नाहीत?”
– मनोज चौधरी, उपमहापौर
दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; भ्रष्टाचाराचा नवा ‘फंडा’
डम्पिंग ग्राउंडवरील महापालिकेचा स्वतःचा वजनकाटाही अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. तो दुरुस्त करण्यासाठी ३ लाख ९७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. यावर आक्षेप घेत उपमहापौर म्हणाले की, खासगी काट्याचे १३ लाख रुपये देण्यासाठी महापालिकेकडे पैसे आहेत, मग स्वतःचा काटा दुरुस्त करण्यासाठी ३-४ लाख रुपये का नाहीत? स्वतःचा काटा दुरुस्त केल्यास अधिकाऱ्यांना मलिदा मिळणार नाही, पण खासगी काट्यावर वजन केल्यास भ्रष्टाचाराला मोठा वाव मिळतो; म्हणूनच हा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा फंडा राबवला जात आहे.
दोन कर्मचारी १५ दिवसांपासून ‘गायब’; मुकादमांवरही संशय
या आर्थिक गैरव्यवहारासोबतच आरोग्य विभागातील प्रशासकीय अनागोंदीही समोर आली आहे. मनपाच्या इमारतीत एकूण ८ कर्मचारी कार्यरत आहेत, ज्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी दोन मुकादम नियुक्त आहेत. मात्र, यापैकी २ कर्मचारी गेल्या १५ दिवसांपासून कोणतीही रजा न घेता गैरहजर आहेत. तरीही त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. हा सर्व प्रकार आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, मनपा आयुक्तांनी तातडीने संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी उपमहापौर मनोज चौधरी यांनी केली आहे.
जामनेर तालुक्यातील ओझर गावात सर्रास गावठी दारू विक्री होत असल्याचा गंभीर आरोप गावातील महिलांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने आज संतप्त असंख्य महिलांनी जामनेर पोलिस ठाणे…
जळगाव:- कामगार आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच कामगार उपायुक्त, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांच्या समस्या व व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या विषयावर कंत्राटी कामगार (नियमन व…
जळगाव शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी ॲक्शन मोडमध्ये; मलेरिया विभागाची घेतली तातडीची बैठ जळगाव: जळगाव शहरात सध्या वाढत असलेला डासांचा प्रादुर्भाव आणि आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात…