जळगावात ५०० होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
प्रशांत सुरळकर यांच्या सामाजिक उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव | प्रतिनिधी
समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरेश सुरळकर यांनी मातोश्री बेबीबाई सुरेश सुरळकर यांच्या प्रेरणेतून रविवारी (दि. २६ जुलै) गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविला. या उपक्रमाअंतर्गत तब्बल ५०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
जैन इरिगेशन सिस्टीम, अण्णासाहेब सागरमल सांखला सोसायटी, रोहित कन्स्ट्रक्शन, नंदिनी ट्रेडिंग कंपनी आणि तरुण कुढापा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे हे सलग आठवे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे महानगरप्रमुख तथा नगरसेवक शरद तायडे, मनपाचे स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, अण्णासाहेब साखला पतसंस्थेचे चेअरमन सुभाषजी सांखला, जैन इरिगेशनचे अधिकारी अनिल जोशी, डॉ. निलेश चांडक, सामाजिक कार्यकर्ते शोएब खाटीक, राजकुमार वाणी, मातोश्री बेबीबाई सुरळकर, मुन्ना परदेशी, राजेंद्र पाटील, सरला चौधरी, संगीता सूर्यवंशी, निर्मला चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष चौधरी, अलका सोनवणे, निलेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकात प्रशांत सुरळकर यांनी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला हातभार लावणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवा
उपमहापौर मनोज चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “तुमच्यातील शिकण्याची जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाची आवडच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. ज्ञानाची ज्योत कायम प्रज्वलित राहू द्या आणि प्रत्येक पावलावर यश तुमच्या सोबत असो,” अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या.
महानगरप्रमुख तथा नगरसेवक शरद तायडे यांनी, “जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणतीही परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही. हे शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल,” असा विश्वास व्यक्त केला.
स्थायी समिती सदस्य विशाल भोळे यांनी विद्यार्थ्यांना मन लावून शिक्षण घेण्याचे आवाहन करत, आपल्या कुटुंबाचे, शहराचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी परिश्रम घेण्याचा संदेश दिला. तसेच पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी डॉ. निलेश चांडक आणि माजी अधीक्षक राजकुमार वाणी यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रोहिणी सुरळकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुन्ना मराठे, भैय्या ठाकूर, अनिल ठाकूर, सुभाष जंगले, प्रकाश चौधरी, राहुल चौधरी, योगेश पाटील, दीपक ठाकूर, कल्पेश बनवे, यश चौधरी, नारायण कोळी, चंद्रकांत सोनवणे, रवींद्र लुले, निलेश पाटील, हितेश वाणी, कन्हैया चौधरी, निलेश कोळी, संदीप चौधरी, भूषण चौधरी, सचिन भावसार, वैभव सूर्यवंशी, संदीप भावसार, पंकज भावसार, पवन भावसार, सचिन चौधरी आणि शंभू भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.
शिक्षणाला प्रोत्साहन देणारा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून, उपस्थितांनी प्रशांत सुरळकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
