जळगाव: सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार आणि समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त भारत अभियान २०२५-२०२६’ अंतर्गत ‘व्यसनमुक्ती संकल्प यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आज ८ मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ औचित्य साधून या जनजागृती मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला.

पथनाट्याद्वारे जनजागृतीवर भर
या अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘पथनाट्याद्वारे जनजागृती’. व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एका खास प्रचार वाहनाची (व्हॅन) व्यवस्था करण्यात आली असून, त्यावर अभियानाचे फलक लावण्यात आले आहेत. ही व्हॅन जिल्ह्यातील विविध भागात फिरून नशामुक्तीचा संदेश देणार आहे.

महिला दिनाचे औचित्य
व्यसनमुक्तीच्या लढ्यात महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कुटुंब व्यसनमुक्त ठेवण्यासाठी महिला पुढाकार घेऊ शकतात, याच उद्देशाने महिला दिनी या यात्रेचा संकल्प करण्यात आला. जळगाव जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने या मोहिमेद्वारे जिल्ह्याला नशामुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे..
या मोहिमेमुळे तरुण पिढीला व्यसनांपासून दूर राहण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि एक सुदृढ समाज घडवण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
पथनाट्य कलावंत विनोद ढगे सचिन महाजन, मोहित पाटील, अभिषेक बोरसे, दर्शन गुजराथी, अरविंद पाटील