सविस्तर बातमी
जळगाव आपल्या मधुर स्वरांनी जगभरातील संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी जळगावात ‘आठवणीतील लतादीदी’ या विशेष कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले होते. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था, आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि मू. जे. महाविद्यालयाचा इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारी रोजी हा सोहळा उत्साहात पार पडला.

दिग्गजांच्या हस्ते दीपप्रज्वलन
कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर दीपमालाताई काळे व माजी महापौर सीमाताई भोळे उपस्थित होत्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲड. मोहन शुक्ला, माजी जि.प. सदस्य डॉ. हर्षल माने, उद्योजक रमेशकुमार मुनोत, निलिमा नायर (डिव्हाईन फ्लाय टूर्स), डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रशांत सोनवणे (बोली स्टुडिओ), शशिकांत वडोदकर (प्रशासकीय अधिकारी, केसीई सोसायटी)

नारीशक्ती संस्थेच्या अध्यक्षा सौ. मनिषाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदाबहार गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
या स्वरमयी संध्याकाळात गायक अमित माळी, विकास जंजाळे, ऐश्वर्या परदेशी, अंजली धुमाळ आणि संघपाल तायडे यांनी लतादीदींची अजरामर हिंदी व मराठी गीते सादर केली. त्यांच्या सुश्राव्य गायनाने उपस्थित रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रतन कुमार थोरात यांनी केले.

संगीत क्षेत्रातील योगदानाचा गौरव
जळगावच्या संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये:
१. आर. डी. पाटील सर
२. सुनंदा चौधरी
३. वर्षा चौधरी
४. संगीता शाह
५. संघपाल तायडे
६. जाकिर खान
यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
नियोजनबद्ध आयोजन
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची संपूर्ण टीम, पंकज कासार आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला जळगावातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
