महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांअर्तगत संजय गांधी विधवा, अपंग, वृद्धपकाळ योजनेअर्तगत पात्र लाभर्थ्यांचा शोध घेवुन त्यांना सदर योजनेचा लाभ देणे बाबत विशेष शोध मोहीम राबविण्यात आले आहे.

संजय गांधी योजना अ वर्ग न.पा क्षेत्र जळगांव शहर कार्यालयामार्फत मनपा संचलीत संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगांव येथील ० ३ पात्र लाभार्थ्यांचा शोध घेवुन संजय गांधी वृद्धपकाळ या योजनेचा लाभदेण्यात आला.

आज २/०२/२०२६ संजय गांधी योजना अ वर्ग न.पा क्षेत्र जळगांव शहर जळगाव कार्यालयात श्रीमती रुपाली काळे, तहसिलदार संजय गांधी योजना अ वर्ग न.पा क्षेत्र जळगांव शहर यांच्या हस्ते मंजुरी आदेश लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले.

त्या प्रसंगी श्री नितीन पाटील ग्राम महसुल अधिकारी, श्रीमती गायत्री दातीर ग्राम महसुल अधिकारी, उपलेखापाल जितेंद्र नेहेते तांत्रिक सहाय्यक पुरुषोत्तम लोहार, संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र जळगाव शहर महानगरपालिकेचे गायत्री पाटील, शालिग्राम लहासे, संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र संचालक प्रशांत गायकवाड, संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी आदि उपस्थीत होते..

संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र संचालक प्रशांत गायकवाड, संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रचे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी यांच्याकडून तहसीलदार रूपाली काळे श्रीफळ व शाल देऊन स्वागत करण्यात आले.