धरणगाव तालुक्यातील निंभोरा वाकटुकी येथील गिरणा नदी पात्रातून हजारो ब्रास वाळूचे उत्खनन झालेले आहे तरी तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी कोणतीही माहिती द्यायला तयार नाहीत एकीकडे अधिकारी कर्मचाऱ्यांना रात्रीच्या रस्त्यावर पाठवून अधिकारी मात्र हात मिळवणे करून सर्रासपणे शासनाच्या वाळू म्हसूल न घेता वाढू माफियांची हात मिळवणी करून सर्रास पणे वाळूची चोरी होत आहे.

स्थानिक गावातील नागरिकांचे आरोप आहे आतापर्यंत हजारो ब्रास वाळु नदीपात्रामधून काढली गेली आहे मात्र अजूनही तो ठेका पूर्ण होत नाही असे काही लोकांनी सांगितले आहे ठेका हा 1874 ब्रास च्या झालेला असून हा ठेका 12/ 1/2026 पासून दिला गेला मात्र रोजची दोनशे ब्रास प्रमाणे पण विचार केला तरी आतापर्यंत 28 तारखेपर्यंत तो 1874झाला नाही अशी माहिती मिळाली आहे

एकीकडे अधिकारी रात्रीच्या कर्मचाऱ्यांना गस्त घालण्यासाठी वाळू चोरी होऊ नये असे दाखवतात मात्र दुसरीकडे अधिकारी आणि वाळू माफिया सर्रास दिवसा कोट्यावधी रुपयांच्या महसूल बोलताना ही दिसून येतात धरणगाव तालुक्यातील कोणी राजकीय हात आहे का असेही प्रश्न या बाबतीत वाटू लागले आहे
एकीकडे कर्मचाऱ्यांवर वाळू माफिया सर्रासपणे हल्ले करतानाही धरणगाव तालुक्यात दिसून आलेले आहेत काहींना जीवे मारण्याची सुद्धा प्रयत्न करताना सुद्धा घटना पोलीस स्टेशन आत नोंद केलेले आहेत मात्र अधिकारी आणि वाळू माफिया सर्रासपणे वाळूच्या चोरी मधील संगम मताने शामिल झालेले सुद्धा दिसून येत आहे असे असे नागरिकांचे म्हणणे आहे