देशभरात व्हॅलेंटाईनचा डेचा उत्साह असताना एका कारमध्ये तरुण, तरुणीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. दोघांच्या डोक्यांवर गोळी लागल्याची खूण आहे.

नोएडा: दिल्लीला लागून असलेल्या नोएडात व्हॅलेंटाईन डेला एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कारमध्ये तरुण, तरुणीचा मृतदेह सापडला आहे. दोघांच्या शरीरावर गोळी लागल्याची खूण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं पोहोचले. मुलाच्या हातात पिस्तुल होतं. त्यामुळे हा प्रकार हत्या आणि आत्महत्येचा असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मुलानं आधी मुलीवर गोळी झाडली असावी. त्यानंतर स्वत:ला संपवलं असावं, अशी शक्यता आहे
नोएडातील सेक्टर ३९ मध्ये ही घटना घडली आहे.

शनिवारी दुपारी एका कारमध्ये तरुणाचा आणि तरुणाचा मृतदेह सापडला आहे. स्थानिकांनी कारमध्ये दोघांचे मृतदेह पाहिले. दोघांच्या शरीरावर गोळी लागल्याच्या जखमा होत्या. त्यांना पाहून लोकांचा थरकाप उडाला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. काही मिनिटांत पोलीस तिथे दाखल झाले. त्यांना तरुणाच्या हातात पिस्तुल दिसलं. त्याच्या शेजारी तरुणी मृतावस्थेत पडली होती.
दोघांना गोळी लागली होती.
तरुणानं आधी तरुणीवर गोळी झाडली आणि त्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडून घेतली, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांना दोघांकडे त्यांची ओळखपत्रं सापडली आहे. त्यावरुन त्यांची ओळख पटली आहे. त्यानुसार मृत तरुण दिल्लीतील त्रिलोकपुरीचा रहिवासी होता. त्याचं नाव सुमित आहे. तर मुलीचं नाव रेखा होतं. ती नोएडा सेक्टर १०१ मध्ये वास्तव्यात होती. दोघांच्या कुटुंबांना माहिती देण्यात आली आहे. दोघे कालपासून म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळपासून घराबाहेर होते.
दोघांचे मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत कारमध्ये सापडले. घटना दुपारी घडली आहे. कारमधून मोठा आवाज आला होता. त्यानंतर डिलिव्हरी बॉयनं याची माहिती पोलिसांना दिली. कारचे दरवाजे आतून बंद होते. तरुणानं आधी तरुणीला संपवलं आणि मग त्यानं आत्महत्या केली, असा संशय आहे.
नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेक्टर ३९ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सेक्टर १०७, दादरी रोड पिलर नंबर ८४ च्या जवळ एक कार सापडली. या कारमध्ये दोघांचे मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं. कारचं निरीक्षण केलं असता आता दोघांचे मृतदेह दिसले. दोघांच्या डोक्यावर गोळी लागल्याची खूण आहे. मुलाच्या हातात पिस्तुल होतं आणि कार आतून लॉक होती.
