शब्द नव्हे, संघर्षातून घडलेलं नेतृत्व : राजेंद्र निकम..
आजचं राजकारण पाहिलं की एक प्रश्न उभा राहतो; लोकप्रतिनिधी लोकांसाठी आहेत की सत्तेसाठी? आमिष, दबाव, सौदेबाजी आणि तडजोडींच्या दलदलीत अडकलेलं राजकारण समाजाचा विश्वास गमावत असताना, प्रभाग क्रमांक ११ मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजेंद्र निकम हे नाव ठामपणे उभं राहतं; कारण ते तत्त्वावर उभे असलेले राजकारणी आहेत.

राजेंद्र निकम हे केवळ उमेदवार नाहीत. ते एक निर्भीड पत्रकार आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले, प्रशासनाला जाब विचारला आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला. ज्यांनी लेखणी विकली, त्यांनी शांतता मिळवली; पण ज्यांनी लेखणी जपली, त्यांनी संघर्ष निवडला व; राजेंद्र निकम हे त्याच संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व आहे.
पत्रकार म्हणून प्रश्न विचारणारा माणूस समाजसेवक म्हणून उत्तर शोधतो. त्यामुळेच निकम यांची भूमिका केवळ टीकेपुरती मर्यादित राहिली नाही. गरजूंसाठी मदत, नागरी प्रश्नांसाठी आंदोलन, आणि प्रशासनाशी थेट टक्कर ही त्यांची काम करण्याची पद्धत आहे. फाईल फिरवणं नव्हे, तर प्रश्न सुटेपर्यंत पाठपुरावा हेच त्यांचं राजकारण आहे.

आज अनेक जण निवडणूक म्हणजे व्यवहार मानतात. मत म्हणजे सौदा, आणि विकास म्हणजे घोषणा. अशा काळात कोणत्याही आमिषाला बळी न पडणारा, दबावाला न झुकणारा आणि स्वाभिमानाला तडजोड न मानणारा चेहरा म्हणून राजेंद्र निकम ओळखले जातात. सत्ता मिळवण्यासाठी मौन स्वीकारणं त्यांना मान्य नाही.
राजकारणात “हो” म्हणणारे खूप असतात; पण लोकांसाठी “नाही” म्हणण्याची हिंमत असणारे विरळ असतात. निकम यांनी ती हिंमत वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्यामुळे ते सत्तेच्या बाजूने उभे नाहीत, तर सत्याच्या बाजूने उभे आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार म्हणजे प्रखर भूमिका, स्वाभिमान आणि कृतीशील नेतृत्व. हा विचार केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता, जमिनीवर उतरवण्याची क्षमता राजेंद्र निकम यांच्यात आहे. म्हणूनच प्रभाग क्रमांक ११ मधील ही निवडणूक केवळ उमेदवारांची नाही, तर तडजोडीच्या राजकारणाविरुद्ध लढणाऱ्या विचारांची आहे.

मूर्ती लहान असली तरी कीर्ती संघर्षातून घडलेली आहे. पत्रकार म्हणून प्रश्न विचारणारा आणि समाजसेवक म्हणून उत्तरासाठी लढणारा हा माणूस आज लोकप्रतिनिधी व्हायला उभा आहे.

प्रभाग क्रमांक ११ मधील सजग, स्वाभिमानी आणि बदल इच्छिणाऱ्या नागरिकांनी या वेळी घोषणांचा नव्हे, तर संघर्षाचा मार्ग निवडावा.
सत्तेसाठी नव्हे, समाजासाठी लढणाऱ्या नेतृत्वाला संधी द्यावी. राजेंद्र निकम यांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन, प्रामाणिक आणि निर्भीड आवाज महापालिकेत पाठवावा. प्रश्न एवढाच आहे. सत्तेचा सोयीस्कर पर्याय निवडायचा, की संघर्षातून घडलेलं नेतृत्व..?
ॲड. जमील देशपांडे
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
