धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,
धरणगाव – उखळवाडी येथे दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुलामध्ये ‘आत्मानंद’ वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन उत्साहात करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष भगवान माळी उपस्थित होते.

यावेळी आत्मा मालिक गुरुकुलाच्या ध्वजाचे ध्वजारोहण केल्यानंतर ध्वजाला मानवंदना देऊन विद्यार्थ्यांनी आणलेल्या मशालीचे पूजन तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.सदगुरु आत्मरूप गुरुमाऊलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

या क्रीडा महोत्सवाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते आत्मानंद क्रीडा महोत्सवाच्या फलकाचे अनावरण करण्यात येऊन मैदानाचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेच्या कालावधीत लिंबू चमचा ,लगोरी,पोते शर्यत,लंगडी,धावणे,कब्बडी, रस्सीखेच, आदी प्रकारचे क्रीडा प्रकार खेळण्यात येणार आहे.

विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाण चे सन्माननीय अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब व सरचिटणीस तथा उखळवाडी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतरावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमास आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरुकुल उखळवाडीचे स्थानिक विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष श्री भगवान माळी विश्वस्त गणेश पाटील,निर्दोष पवार,किशोर निकम, गोरख महाजन,संपर्क अधिकारी प्रमोद शेलार,सचिव अशोक चव्हाण विद्यार्थ्यांचे पालक तसेच ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उखळवाडी गुरुकुलाचे ,मुख्याध्यापक गौतम पगारे पुरणगाव गुरुकुलाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण घोगरे सर राहुल बरकले सर आदी शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गायत्री पगारे मॅडम यांनी केले.