धरतणगाव – चावलखेडा येथिल आदिवासी नागरीकांनचे घरकुलाच्या फाईली गेल्या चार वर्षा पासुन धरणगाव पंचायत समितीत धुळखात पडुन आहे तसेच चावलखेडा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक कड़े घरकुलसाठी फेऱ्या मारून थकलेल्या पत्राच्या कुडामातीच्या छपराखाली राहणाऱ्या भिल्ल सामाजाच्या आदिवासींवर कुणी घर देता का घर अशी म्हणण्याची वेळ आली आहे,

केंद्र आणि राज्य सरकारने कोणतेही कुटुंब बेघर राहणार नाही यासाठी विविध योजना राबवल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने आदिवासीजातीन साठी केंद्र सरकारने विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शबरी घरकुल योजनेवर आधारित घरकुल योजना तयार केली आहे,
तरीदेखील धरणगाव तालुक्यातील चावल खेडा येथिल गेल्या चार वर्षापासून भिल्ल आदिवासी दहा लाभार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आदिवासी नागरिकांनी केला आहे,

आदिवासी समाजामध्ये सर्वात मागासलेला समाज म्हणून भिल्ल जमात ओळखली जाते, या जातीमधील सर्व लाभार्थी भूमिहीन आहे, त्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी ही कुटुंबिक खरीप हंगाम संपतात, स्थानिक ठिकाणी रोजगार न मिळाल्यास स्थलांतरित होतात, यातील बहुसंख्य कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घर नाही, त्यामुळे सरकारने यापूर्वी असलेले इंदिरा आवास योजनेऐवजी तिचे नाव बदलून पंतप्रधान आवास योजना आणि शबरी घरकुल योजना सह आदिवासी विभागाकडून केंद्र सरकारच्या निधीची केवळ आदिवाशी जमातीसाठी घरकुल योजना सुरू केली आहे केली आहे,

त्यासाठी आज दि. ३०/१२/२०२५ रोजी चावलखेडा येथिल घरकुल योजने पासुन वंचित लाभार्थ्यांनी जळगाव जिल्हा अधिकारी यांना घरकुलचा लाभ मिळावा म्हणुन निवेदन दिलेअसुन त्यात ननमुद केले आहे की, न्याय न मिळाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव येथे आपल्या दालनात समोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन कर्त्यानीं म्हटले आहे,
निवेदन दूतेवेळी, ताराचं धनसिंग सोनवणे, अशोक साहेबराव ठाकरे, मंगल सुपडु भिल, अंजनाबाई हरी भिल, मिना सुकदेव सुर्यवंशी, तसेच सर्व घरकुल पासुन वंचित लाभार्थी उपस्थित होते,
