जळगाव शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात मनसे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ॲड जयप्रकाश बाविस्कर यांच्या हस्ते आज उमेदवारांना मनसेचे अधिकृत एबी फॉर्म वाटप करण्यात आले. फॉर्म वाटप करते वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे पण उपस्थित होते.

मनसे नेते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की पहिली यादी आमची आज आम्ही प्रकाशित केलेले आहे उर्वरित यादी आम्ही सकाळी प्रसारित करू असे बाविस्कर यांनी सांगितले..

मनसेचे ३ जळगाव शहर उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, ललित (बंटी) शर्मा, प्रकाश जोशी, तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत.. दरम्यान दोन महिला यांना सुद्धा पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यामुळे मनसे सर्व वार्डामध्ये बाजी नक्की मारणार असे मनसे नेते बाविस्कर यांनी कळविले.
