गिरणा नदीला वाळू माफीयांचे ग्रहण थांबणार का ? ; धानोरा हद्द परिसर बनला वाळु उपसा फॅक्टरी ; माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक गुप्ता यांच्याकडून
तालुका महसुल विभागाच्या पोलखोली नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईत 1800 ब्रास वाळु साठा जप्त..

जळगाव : जळगाव तालुक्यातील धानोरा हद्दीत धरणात गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड प्रमाणात यंत्राच्या साह्याने अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाला अवैध वाळु उपसा काही महसूल अधिकाऱ्यांच्या हप्तेखोरीमुळे थांबण्यात सपशेल अपयश येत असल्याने गिरणा नदीला वाळूमाफियांचे एक प्रकारे ग्रहणच लागले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे तसेच महसूल विभागाकडून वाळु माफीयां विरोधात पाहिजे तशी कारवाई केली जात नसल्याने वाळु माफिया बेधडकपणे रात्रंदिवस वाळु उपसा करत असल्याचे गिरणा नदीचे अस्तित्व धोक्यात येत असल्याने भविष्यात मोठे जलसंकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र याचे कुणालाच सोयीसुतक नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या 13 मिनिटाच्या व्हिडिओ नंतर महसूल प्रशासन खळबळून जागा होऊन 1800 ब्रास वाळु साठा जप्त :— जळगाव तालुक्यातील मोहाडी जवळ धानोरा हद्दीत प्रचंड प्रमाणात होणाऱ्या रात्रंदिवस वाळु ऊपशामुळे महसूल प्रशासनाचे कोट्यावधी रुपयाचे आर्थिक नुकसान होत असल्याने व काही महसूल अधिकारीं हप्ते खोरीमुळे झोपेचे सोंग घेत असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी थेट गिरणा नदीत धानोरा हद्दीत उतरून सुमारे एक किलोमीटर अंतरापर्वायंत प्रचंड प्रमाणात अवैध वाळू साठे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांचा संताप अनावर झाला व त्यांनी महसूल प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत तब्बल 13 मिनिटांचा व्हिडिओ तयार करत महसूल प्रशासनाला खडबडून जागा केला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसारअप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या टीम कडून धानोरा हद्दीत उतरून तब्बल 1800 ब्रास एवढ्या प्रचंड प्रमाणात अवैध वाळु साठा जप्त करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळु जप्तीची कारवाई ही पहिल्यांदाच असेल असे मत व्यक्त केले जात आहे

धानोरा हद्द परिसरात 70 ते 80 यंत्राच्या साह्याने पाण्यातून दररोज हजारो ब्रास अवैध वाळु ऊपसा काढला जातो तर हा उपसा गेल्या काही महिन्यांपासून होत आहे त्यामुळे महसूल प्रशासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडत असल्याने यातील संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे
तसेच कारवाईनंतर वरिष्ठ महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर असून ज्यांच्या या ठिकाणी नियुक्ती करण्यात आल्या होत्या त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे
अवैध वाळू वाहतुकीमुळे धानोरा ते मोहाडी पर्यंत रस्त्याची लागली वाट एसटी बसेस ही येईनात ; शाळकरी मुलांचे अतोनात हाल, दररोज आठ किलोमीटरचा पायी प्रवास. धानोरा गिरणा हद्दीतून होत असलेल्या प्रचंड प्रमाणात अवैध वाळू उपशामुळे व अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे धानोरा ते मोहाडी जवळील चार पुलाव पर्यंत रस्त्यांची प्रचंड वाट लागली असल्याने गावात एसटी बसेस येईनासा झाल्या आहेत त्यामुळे शाळकरी मुले व प्रवाशांना प्रचंड हाल होत असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनींना जीव डोक्यात घालून रोजच आठ किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे धानोरा ते मोहाडी जवळील चार पुलाव पर्यंत अतर चार किलोमीटरचे असून
विद्यार्थ्यांना पुला पर्यत दोन्हीकडून चार चार किलोमीटर असे आठ किलोमीटरचे अंतर पायी चालत जाऊन पुढे एसटी बसेस ने प्रवास करावा लागतो एसटी बस ही फक्त चार पर्यंत च येत असल्याने रस्त्यांमुळे एसटी बसेस नसल्याचे सांगण्यात येते
कारवाईत या अधिकाऱ्यांचा समावेश :–जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अप्पर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, खनिज कर्म अधिकारी रूपाली काळे, मंडळ अधिकारी हेमंत मारोडे, तलाठी कविता तायडे, यांच्या वतीने धडक कारवाईत 1800 ब्रासचे वाळू साठे जप्त करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे