
मतमोजणी पुढे ढकलल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता राखण्यासाठी निर्णायक मागणी.
जळगाव / चोपडा :
चोपडा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पारदर्शकतेच्या दृष्टीने, आणि Strong Room मधील EVM यंत्रणांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. निलेश दत्तात्रय बारी यांनी आज (SP) जिल्हा पोलीस निरीक्षक मा. महेश्वरी साहेब यांना औपचारिक निवेदन सादर केले.
मतमोजणीची तारीख न्यायालयीन आदेशामुळे २१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे EVM ठेवलेल्या Strong Room वर २४ तास देखरेख, जॅमर बसविणे, बंदोबस्त वाढविणे व इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप रोखण्याचे उपाय तातडीने करणाऱ्या मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या.

श्री. बारी यांनी सांगितले की,
“EVM मशीन सुरक्षित ठेवणे ही निवडणूक प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. Strong Room जवळ कोणताही इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप किंवा अवांछित हालचाल होऊ नये म्हणून जॅमर बसविणे आवश्यक आहे. याबाबतचा अर्जसुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला असून त्याची प्रत पोलीस प्रशासनालाही समर्पित केली आहे.”
यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जॅमर बसविण्यासाठी सविस्तर अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याचा संदर्भ देत श्री. बारी यांनी पोलीस विभागाने तातडीने सुरक्षा उपाययोजना मजबूत करण्याची विनंती केली.
(SP) जिल्हा पोलीस निरीक्षक महेश्वरी साहेबांनी निवेदन स्वीकृतीदरम्यान सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत कायदा सुव्यवस्था आणि Strong Room सुरक्षा अधिक बळकट करण्याचे आश्वासन दिले.

