जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाचे वाळूतस्करीवर नियंत्रण नसल्याने तस्कर मुजोर झाले आहे. विनापरवाना वाळूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणारे तलाठी राजू कडू बाहे (वय ५३) यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली.

तसेच शिवीगाळ करीत टॉमीने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १ रोजी दुपारी ३.३० वाजता खंडेराव नगरात घडली. याप्रकरणी वाळूमाफिया मनोज रमेश भालेराव, फैजल खान ‘आणि चालकाविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंप्राळ्याचे तलाठी राजू बाहे हे खंडेराव नगराकडून तलाठी कार्यालयाकडे जात होते. त्यांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर थांबवून
परवान्याबाबत चालकाकडे विचारणा केली. या वेळी ट्रॅक्टरच्या मागून दुचाकीवरून यापूर्वी वाळू वाहतुकीची कारवाई केलेला मनोज भालेराव हा त्याचा मित्र फैजल याच्यासोबत तेथे आला. त्याने बाहै यांची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली आणि त्यांना ढकलून दिले. फैजल याने बाहे यांच्यावर टॉमीने हल्ला केला;

परंतु बाहे हे बाजूला सरकल्यामुळे चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. याप्रकरणी तलाठी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून संशयित मनोज सुरेश भालेराव, फैजल खान व ट्रॅक्टरचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. दरम्यान, शहरात बेसुमारपणे वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे. याबाबत महसूल व पोलिस प्रशासन ठोस पाऊल उचलत नसल्याने वाळू तस्कराकडून बिनधास्तपणे नदी पात्रातून वाळू चोरी सुरू आहे. करण्यात आला