नक्कीच पैसा आणि सरकारी नोकरी असणार…’ लग्नाचे फोटो शेअर होताच नववधू ट्रोल, पण नवरदेवाची ‘ती’ एक पोस्ट आणि सगळ्यांची बोलती बंद

सध्या सोशल मीडियावर असंच काहीसं पण लोकांना विचार करायला भाग पाडेल असं प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला तर लोकांनी ट्रोल केलं परंतू नवरदेवानं जेव्हा सत्य सांगितलं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं तर काहींना त्याचं कौतुक देखील केलं आहे.

खरं प्रेम हे व्यक्तीचा रंग, जात, धर्म किंवा सामाजिक स्थिती पाहून होत नाही. असं म्हणताना तुम्ही लोकांना अनेकदा ऐकलं असेल. परंतु अनेकदा अशा काही घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये प्रेम नाही. तर पैसा आणि प्रॉपर्टी बघून लग्न केलं जातं. यासंबंधीत अनेक प्रकरण सोशल मीडियावर देखील व्हायरल झाल्या आहेत. नवरदेवाकडे खूप पैसा आहे किंवा सरकारी जॉब आहेत म्हणून चांगल्या चांगल्या मुली त्यांच्याशी लग्न करतात आणि इथे इतर मुलं मात्र प्रेमाच्या विरहात रडत बसतात अशी समजूत अनेकांची आहे आणि सोशल मीडियावर देखील याबद्दल वारंवार बोललं जातं आणि ते काही अंशी खरं देखील आहे.

सध्या सोशल मीडियावर असंच काहीसं पण लोकांना विचार करायला भाग पाडेल असं प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये सुरुवातीला तर लोकांनी ट्रोल केलं परंतू नवरदेवानं जेव्हा सत्य सांगितलं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं तर काहींना त्याचं कौतुक देखील केलं आहे. आता तुम्हाला हे ऐकून प्रश्न पडला असेल की नक्की असं काय घडलं असेल?
खरंतर मध्यप्रदेशातील एका तरुण जोडप्यांनी लग्न गाठ बांधली आणि त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर व्हायरल झाले. ज्यामध्ये तरुणी म्हणजे नवरीमुलगी खूपच सुंदर आणि तरुण दिसतंय असं नेटकऱ्यांनी म्हटलं तर नवरा मुलगा सावळा असल्याचं अनेकांनी म्हटलं. अशा परिस्थित या सुंदर तरुणीनं पैशांसाठी किंवा सरकारी नोकरीसाठी त्या मुलाशी लग्न केलं असणार असं म्हणत अनेकांनी त्या जोडप्याला ट्रोल केलं. पण याला अखेर नवऱ्या मुलानंच उत्तर दिलं आहे.
मध्य प्रदेशात राहणारे ऋषभ राजपूत आणि शोनाली चौकसी यांची प्रेमकथा कॉलेजच्या दिवसांपासून सुरू झाली. तब्बल 11 वर्षे एकमेकांसोबत राहिल्यानंतर, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ऋषभने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, तो या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होता. शोनालीला नवरीच्या रूपात पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले, इतका तो आनंदित होता. या जोडप्याने आपल्या पारंपरिक लग्नसोहळ्याचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

फोटो व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी नकारात्मक कमेंट्स करण्यास सुरुवात केली. नवरदेव ऋषभचा रंग सावळा असल्यामुळे त्याला टार्गेट करण्यात आलं. काही ट्रोलर्सनी तर शोनालीने ऋषभच्या रंगाकडे दुर्लक्ष करून केवळ त्याच्या चांगल्या कमाईमुळे लग्न केले, असा बिनबुडाचा आरोप केला. जेव्हा हे ट्रोलिंग वाढले, तेव्हा ऋषभ शांत बसला नाही. त्याने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एक भावनिक पोस्ट लिहून या ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले.

ट्रोलर्सला उत्तर देताना ऋषभ म्हणाला, “मी सरकारी कर्मचारी नाही, पण माझी कमाई चांगली आहे हे मान्य आहे. पण… जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते, मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हापासून शोनालीने माझ्यावर प्रेम केलं आहे. तिने माझा रंग किंवा बँक बॅलन्स नाही पाहिला. तिने माझ्यासोबत 11 वर्षे घालवली आहेत.”
ऋषभच्या या उत्तराने अनेक युजर्सना प्रभावित केले. त्याने रंगावरून होणाऱ्या भेदभावावरही भाष्य केले. तो म्हणाला की, ‘मी सावळा आहे हे सत्य स्वीकारतो, पण तुम्हालाही माझ्यासारखे निखळ प्रेम मिळो,’ अशी त्याने इच्छा व्यक्त केली.
.