*
पूज्य साध्वी कपिला दीदी…
*उद्या विशेष शुक्रवार,गोसेवार्थ छप्पन भोग*
जळगाव — शहरातील पांजरापोळ संस्थेत भव्य अलौकिक गौकथेचे दिनांक 11 ते 15 नोहेंबर दरम्यान दुपारी 03 ते सायंकाळी 06 वाजेदरम्यान पाच दिवसीय भव्य आयोजन करण्यात आले असून आज तिसऱ्या दिवशी *गोमातेला सुंदर चुनरी* देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी असंख्य उपस्थित भाविकांन समोर पूज्य साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदी यांनी देव लोक आणि भारतीय संस्कृतीत सर्वात श्रेष्ठ गोसेवाच असल्याचे सांगून पुराणातील दाखले देऊन उद्बोधन केले.तर पर्यावरण संतुलन,सकल हिंदुराष्ट्राच्या उन्नती करिता गोरक्षण काळाची गरज असून शारीरिक व्याघी असलेल्या गाईंची सेवा करणाऱ्यास परम पुण्याची सहज प्राप्ती होते.
*दिनांक 14 नोहेंबर* शुक्रवार रोजी जळगावात प्रथमच गौसेवा कथेत गोमाते करिता 56 भोग लावण्यात येणार असून हा प्रसंग पाहण्यासारखा असल्याने उपस्थितीचे आवाहन पांजरापोळ संस्था, माहेश्वरी महिला मंडळ पदाधिकारी सदस्य आयोजक यांनी नम्र पणे केली आहे.