जळगाव :पारोळा व मुक्ताईनगर याकडे जाणारा नॅशनल क्रमांक सहा या ठिकाणी सकाळी सात वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत महामार्ग पोलीस येथील ट्राफिक कर्मचारी हे रोज सकाळी पारोळा टोल नाका तसेच ऑडनस फॅक्टरी यांच्याजवळ उभे राहून लोडिंग गाडी चालवणारे ड्रायव्हर सर्वे कागदपत्र असल्यावर सुद्धा त्यांच्याकडून मोठी लूटमार करत असल्याचे दिसून येत आहे?
संबंधित अधिकारी यांना विचारले असता त्यांचे उत्तर आम्हाला उभे राहण्याची परवानगी आहे, असे त्यांच्याकडून कळविण्यात आले होते. पुढील कारवाई शासन करणार का असा संकोच नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
परंतु असा कोणताही शासकीय नियम नाही आहे, सकाळी सहा वाजेपासून गाडी आडविणे व त्यांच्याकडून पैसे घेणे हा निवड धंदा सुरू आहे असे तेथील नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

