उद्या रत्नागिरी विरुद्ध नागपूर सामना रंगणार एसटी महामंडळाच्या अंतर्विभागीय क्रीडा स्पर्धा जळगाव शहरातील जैन ड्रीम स्पेसेस येथील क्रिकेट मैदानावर सुरू असून सकाळच्या सत्रात रायगड विरुद्ध यवतमाळ विभाग असा सामना आयोजित केला होता. 20 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेला आज एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री विजय गीते हे मैदानावर उपस्थित होते.

या सामन्यात यवतमाळ संघाच्या अफजल खान या गोलंदाजाने हॅट्रिक घेतल्यामुळे त्याला सामनावीर घोषित करण्यात आले. एसटी महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री विजय गीते यांच्या हस्ते त्याला पुरस्कार देण्यात आला.
दुपारच्या सत्रात बुलढाणा विरुद्ध चंद्रपूर विभागाचा सामना रंगला. या सामन्यात बुलढाणा विभाग विजयी ठरला. चंद्रपूर विभागाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांना 84 धावांमध्ये समाधान मानावे लागले.
यवतमाळ संघाने नाणेफेक जिंकून रायगड संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रायगड संघाने आपल्या आठ विकेट गमावून 20 षटकांमध्ये 130 धावा केल्या. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या यवतमाळ संघाने दोन गडी शिल्लक असताना हा सामना 131 रन्स करून जिंकला.
त्यामुळे बुलढाणा संघ विजयी झाला. सामनावीर म्हणून गुड्डू अझर यांना यंत्र अभियंता श्री सुनील भालतिडक यांनी सन्मानित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप दारकुंडे व गोपाळ पाटील यांनी केले तर जळगांव विभागातील क्रीडापटू अजय साळवे, भरत परदेशी, नासिर शेख, विकास पाटील, दिनेश पवार यांनी सहकार्य केले.
बुलढाणा विभागाचे गोलंदाज गुड्डू अझर यांनी तीन विकेट घेतल्यामुळे चंद्रपूर विभागाला केवळ 84 रन करता आले. बुलढाणा संघाकडून अजहर गुड्डू यांनी अवघ्या तीन षटकांमध्ये दहा धावा देऊन चंद्रपूरच्या चार फलंदाजांना बाद केले.
