दिनांक – १४/११/२०२५ रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव आणि रोटरी क्लब जळगाव व सोसायटी ऑफ अनेस्थेशिऑलॉजिस्टच्या संयुक्त विद्यमाने जीवन संजीवनी आपात्कालीन उपचार व CPR प्रशिक्षण कार्यक्रम* उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये रोटरी क्लब अध्यक्ष श्री. गिरीश कुलकर्णी.

, मा. सचिव श्री. सुभाष अमळनेरकर,कार्यकारी सचिव श्री. पंकज व्यवहारे देवगिरी प्रांत मेडिकल विभागाच्या प्रमुख व MD/ICU स्पेशॅलिस्ट डॉ. लीना पाटील, जनरल फिजिशियन डॉ. सुनील सुर्यवंशी, डॉ. जयश्री राणे आणि श्री. सुबोध सराफ यांचा समावेश होता. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या ओळखीने करण्यात आली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री. गिरीश कुलकर्णी म्हणाले, आपत्कालीन प्रसंगी योग्य वेळी दिलेली पहिली मदत जीवनदान ठरू शकते. प्रत्येक तरुणाने मूलभूत वैद्यकीय ज्ञान व प्राथमिक उपचार कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.” त्यांनी पहिल्या काही मिनिटांचे महत्त्व अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांना सीपीआर म्हणजे काय, सीपीआर कोणाला देता येतो, सीपीआर कसा दिला पाहिजे याबद्दल डाॅ. लिना पाटील* यांनी विस्तृत माहिती दिली.
डॉ. लीना पाटील यांनी गोल्डन अवर, हृदय बंद पडल्यास घ्यावयाची पावले, छाती दाबण्याची योग्य पद्धत, श्वसन पुनर्संचय (rescue breaths) आणि CPR चे वैज्ञानिक महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. “शांत राहून योग्य तंत्राने केलेली त्वरित कृती प्राणवाचक ठरते,” असे त्यांनी सांगितले.
प्रात्यक्षिक सत्रात विद्यार्थ्यांना CPR, पल्स तपासणी, प्रतिसाद तपासणी, श्वासमार्ग खुले करणे यांसारख्या जीवनरक्षक तंत्रांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत वास्तविक परिस्थितीत कशी योग्य प्रतिक्रिया द्यायची हे शिकले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. ललिता पाटील असून, कार्यक्रमाला AI & DS विभाग प्रमुख डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. खुशाली बेलदार यांनी उत्कृष्टरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.
समारोपात प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील* यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणाचा उपयोग समाजहितासाठी करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि सुरक्षा-जागरूकतेसाठी अशा उपयुक्त व जीवनावश्यक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे त्यांनी
आश्वासन दिले.
जीवन संजीवनी कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत सजगता व जबाबदारी निर्माण करणारा अत्यंत परिणामकारक उपक्रम ठरला.
सदर कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर, डॉ. वर्षा पाटील मॅडम (सचिव), डॉ. केतकी पाटील मॅडम (सदस्य), डॉ. वैभव पाटील सर (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील सर* यांनी कौतुक केले.

