जळगाव — जे नाही त्याची खंत करण्यापेक्षा जे आहे त्यात समाधान मानून जीवन आनंदाने जगणारे विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी हे आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता सतत सामजिक,आरोग्य,रक्तदान सेवेत निस्वार्थ सेवारत आहेत.

रक्तदान जनजागृती कार्यासाठी शतकवीर रक्तदाते मुकुंद गोसावी यांची ब्रँड ॲम्बेसेडर तर कोरोनाच्या गंभीर काळात लसीकरण स्टार प्रचारक तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान कार्यासाठी ते डिस्ट्रिक आयकॉन पदावर कार्यरत होते.

विविध समाजपयोगी राष्ट्रीय कार्यातही ते सहभागी होत असतात.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव आदरणीय श्री.गुलाबरावजी पाटील यांनी मुकुंद गोसावी यांचे स्वयंस्फूर्त कौतुक करून उज्वल कार्यासाठी शुभकामना दिल्या.
