जामनेर तालुक्यातील भागदरा गावामध्ये मूलभूत प्रशासकीय व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. गावात अनेक गंभीर समस्या असताना नागरिकांचा आवाज ऐकण्यासाठी आवश्यक असलेली एकही ग्रामसभा दीर्घकाळापासून घेण्यात आलेली नाही, ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.

गावातील नागरिकांनी एकत्र येत आपली व्यथा मांडताना मांडली आहे, ग्रामसभा होत नसल्यामुळे गावाच्या प्रश्नांवर चर्चा, निर्णय व ठरावच होत नाहीत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य, शासकीय योजनांचा लाभ यासारख्या मूलभूत विषयांकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.

याहून गंभीर बाब म्हणजे, गावातील अनेक नागरिकांना ग्रामसेवक कोण आहेत, ते केव्हा येतात आणि केव्हा जातात याचीही माहिती नागरिकांना नाही.

गावातील कोणतीही समस्या ही सोडण्यासाठी ग्रामपंचायतशी संपर्क साधायचा म्हटले तरी कोणाशी बोलायचे, हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. ग्रामपंचायतला सरपंच नामधारी सरपंचाचे भाऊ कारभारी असा कारभार सध्या भागदरा गावामध्ये दिसून देत आहे.

ग्रामसभा न झाल्याने शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचत नाही, तसेच तक्रारी मांडण्यासाठी कोणताही अधिकृत मंच उपलब्ध नाही. त्यामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व घटनेकडे जिल्हा परिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

गावात,दलित वस्तीत रस्ते, नाले, दिवे सगळेच फक्त कागदावर? बातम्यांची दखल घेत प्रशासन जागे झाले, ग्रामपंचायत मात्र झोपेतच! सरपंच आणि ग्रामसेवकाचे उद्धट वर्तन – नागरिकांच्या आरोपांवर प्रशासन कारवाई करणार का?