*गोसेवा भवसागर पारकरणारी कथा* शिवप्रिय
*बिल्व वृक्षाची उत्पत्ती गाईच्या शेणातून*
— साध्वी कपिला गोपाल सरस्वती दीदीजी —
जळगाव — पांजरापोळ संस्था आणि माहेश्वरी महिला मंडळाच्या सहयोगाने भव्य सुंदर संगीतमय गौकथेचा आज चौथा दिवस असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न,आज गोमातेला विविध पक्वान्नांचा 56 भोग प्रसाद अर्पण करण्यात आला.
आजच्या कथे प्रसंगी दीदींनी कलीकाळात गोसेवाच पुण्यदाई व भवसागर पार करणारी कथा असल्याचे सांगून पुराणोक्त दाखले दिले. महादेवाला प्रिय असे बिल्व वृक्ष गाईच्या शेणातून निर्माण झाल्याने त्यात सदैव लक्ष्मीमातेचा वास असतो. गाईची शेपटी डोक्यावरून अंगावरून फिरवली तरी मोठे पुण्य लागते,आज परिवारात पूर्वी सारखं गोधन पुजल्यास त्याची सेवा केल्यास कल्याण व उत्कर्ष हा होतोच. पूज्य देवराह बाबा यांनी सुद्धा
गोहत्या बंद झाल्याशिवाय आपला समाज आणि राष्ट्र सुरक्षित आणि सुखी राहू शकणार नाही असे सांगितले आहे, त्या काळात महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी वडील मुगल सेवक असतानाही आपल्या वयाच्या आठव्या वर्षीच गोहत्येचे पातक करणाऱ्याचे शिर धडावेगळे केले होते त्याच प्रमाणे महाराणा प्रतापसिंह यांनीही गोहत्या रोखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला
म्हणूनही हे दोघे आजही पूजनीय आहेत .महाराष्ट्रात खानदेश आणि जळगावची परिस्थिती गोहत्तेमध्ये मालेगाव नंतर अतिशय दयनीय आहे काही ठिकाणी लहान लहान गल्लीबोळात होत असलेले गोहत्या थांबल्या पाहिजेत. केंद्र सरकारसह सर्वच राज्य सरकारांनी यात लक्ष घातल्यास गोहत्येला नक्की पाय बंद होऊन राष्ट्र पुन्हा आनंदी आणि सुजलाम सुफलाम होईल. गाईचे गोमूत्र,शेण, दुध, दही,तूप,लोणी सार पौष्टिक असून ते शास्त्रीय दृष्टिकोनातून ही मान्य केल आहे. आजच्या कथे नंतर समस्त अग्रवाल समाजातर्फे प्रसाद वाटप करण्यात आला.
दिनांक 15 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी कथेचा समारोप असून गोमय वातावरणातून व्याधीमुक्ती यावर विशेष कार्यक्रम आणि माहिती मिळणार असल्याने नागरिकांन