जळगाव – शहरातील दिव्यांग विक्रमी रक्तदाता मुकुंद गोसावी
यांनी आपले वडील कै.देवपुरी रामपुरी (डी.आर.नाना) गोसावी यांच्या वयोमानाने डिसेंबर २०२४ मध्ये निधनानंतर परंपरा बाजूला ठेवून पहिल्या ते तेरा दिवसात रामद्वारा सत्संग,वृक्ष वाटप,रोपण,अन्नदान,सामजिक

कार्य,अवयवदान,देहदान,रक्तदान, मतदान जागृती करत तेराव्या दिवशी समाज बांधव परिवारिक यांनी (रुमाल,टोपी,कपडे आदी देणे,बाहेर काढणे) दुखवटा न करता फक्त एक एक वृक्ष लावून रक्तदानाचे आवाहन केले होते यावेळी नातेवाईक,परिचित अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून वृक्षही लावले पण कुणी कौतुक तर काहींनी नाराजी व्यक्त केली .

समाजाच आपण काहीतरी देणं लागतो या निरपेक्ष भावनेने वडिलांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त तसेच संघ शताब्दी वर्ष व वंदे मातरम् या गीताला दिडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० ते ०३ वाजे दरम्यान मुकुंद गोसावी यांच्या घराजवळ श्रीराम नगर (दादावाडी परिसर) येथे विश्व शांती प्रार्थना,वृक्षरोप वाटप,वृक्षारोपण,

अवयवदान,देहदान,मतदान जागृती तसेच भव्य मोफत आरोग्य तपासणी,औषधोपचार,मार्गदर्शन शिबिर व सध्या सुरळीत रक्तपुरवठा कमी झाल्याने *रक्तदान* शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. या पावन कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन गोसावी परिवारातर्फे करण्यात आले आहे.