दोन महिन्यांपूर्वी प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या त्या प्रभाग रचनेवर अनेक नागरिकांनी व निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात हरकती नोंदवल्या परंतु मनपा प्रशासनाने हरकती बाबत काहीही कारवाई केली नाही इतर मागासवर्ग आरक्षण काढण्याबाबत ही मनपा प्रशासन अपयशी ठरल्याने राज्य निवडणूक आयोगाने फटकारल्याने परत काही ठिकाणचे आरक्षण काढावे लागले.

दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्ररूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या त्यातही मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला असून 5000 ते 6000 तक्रारी मनपाकडे नोंदवण्यात आल्या आहेत,त्यात प्रारुप यादीत प्रत्येक प्रभागात 2000 ते,3000 नावे दोन्ही प्रभागात दुबार आली. असून याद्या प्रभाग वाईज विभाजित करीत असताना गोंधळ करून ठेवला आहे.15 ते 20 वर्षांपूर्वी स्थलांतरित झालेले नावे व मृत्यू पावलेले मतदारांचे नावे अजूनही सर्व, प्रभागातील याद्या मध्ये दिसून येत आहे,सत्ताधारी पार्टीतील इच्छुक उमेदवारांना निवडणूक सोपी जावी व त्यांना निवडनुक लढण्या कामी सोपे जावे.याकरिताच मनपा प्रशासनाने राजकीय दबावाला बळी पडून प्रभाग रचना असो की आरक्षण सोडत असो व आता मतदार याद्या मध्ये करण्यात आलेला गोंधळ असो हा सोयीस्करपणे केला आहे.असे आमचे ठाम मत आहे.

मतदार यादीतील दुबार नावे मृतांची नावे दुसऱ्या विधानसभा मतदार संघातील नावे व मतदार याद्या विभाजित केल्यानंतरही दोन दोन तीन तीन प्रभागातील आलेले नावे कमी करण्याचा अधिकार मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहे.मनपा आयुक्त तथा निवडणुक निरणय अधिकारी यांना मागणी करण्यात येत आहे की प्रभाग मतदार यादीतील दुबार नावे मृत्यूंची नावे व इतर,मतदारसंघात व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील नावे कमी,केल्याशिवाय निवडणूक प्रक्रिया राबवू नये.तसेच मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी अजून आठ दिवसांचा कालावधी वाढवून द्यावा.
अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारादेण्यात येत आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर अध्यक्ष इजाज मलिक, माजी अध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, माजी नगरसेवक सुनील माळी, राजू मोरे, मजहर पठाण ,डॉ. रिजवान खाटीक, गौरव वाणी, कलाबाई शिरसाट रहीम तडवी ,आकाश हिवाळे,गणेश पाटील, गौरव डांगे, कैलास पाटील व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन सादर करण्यात आली जळगाव शहर मनपा निवडणूक 2026 मध्ये होऊन घातली असून मनपा प्रशासन गेल्या तीन महिन्यात पासून निवडणूक तयारी जोमाने करीत आहे. परंतु खेदाने म्हणावे लागत आहे की मोठ्या प्रमाणात प्रारुप प्रभाग,रचना असो आरक्षण सोडत असो,वा आता प्रमुख मतदार याद्या.प्रकाशित करणे असो, या सर्व प्रक्रियेत मनपा प्रशासनाचा गलथान कारभार दिसून येत आहे.